नाशिक – प्रवासात महिलेच्या पर्समधील सुमारे पाच तोळ्याची सोन्याची चेन चोरट्यांनी लंपास केली. सायखेडा-लाखलगाव दरम्यान प्रवास करतांना ही घटना घडली. निर्मला गुलाबराव तनपुरे (वय ५९, सुतारगल्ली ओझरमिग) यांनी या चोरीची तक्रार केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवारी साडे दहाच्या सुमारास प्रवास करीत असतांना चोरट्यांनी पाळत ठेऊन पर्समधील सुमारे साडे पाच तोळ्याची सोन्याची पोत चोरली. या चोरीप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.