नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पळसे येथील इंडस एअरटेल कंपनीच्या मोबाईल टॉवरच्या शेल्टर रूमजवळ असलेल्या बी.टी.एस मधील एएसआयबीचे एक आणि एबीआयएसचे दोन नग असे एकूण १५ हजार रुपये किंमतीचे तीन नग कार्ड अज्ञात चोरट्याने काढून चोरून नेल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. या मोबाईल टॉवरच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे दत्ता सगर रा. श्री छाया सोसायटी, सैलानी बाबा स्टाँप, जेलरोड, नाशिकरोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.