नाशिक – हवालदाराला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. सातपूरला अशोकनगर भागात ही घटना घडली. हवालदाराला मारहाण करणा-या अरुण सखाराम बनसोडे (वय २७, भगवती गार्डन, अशोकनगर सातपूर मूळ टाकळी कोथाळा परभणी ) याला अटक करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास अशोकनगर पोलिस चौकीजवळील अंबिका मेडीकल दुकानासमोर सातपूर पोलीस ठाण्यातील संजय निवृत्ती चव्हाण (वय ५१) त्यांचे सहकारी बेडकुळे हे उभे असतांना संशयित अरुण बनसोडे याने हवालदार चव्हाण यांच्या कानाशिलात मारत शासकीय कामकाजात अडथळा आणला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.