नाशिक – दुचीकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने महिलेचा मृत्यु
नाशिक – दुचीकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने महिलेचा मृत्यु झाला आहे. मखमलाबाद रोड वर विठ्ठल रुक्मीणी मंगल कार्यालयाजवळ गुरुवारी हा अपघात झाला. आशा विश्वास भट (वय ६९, गुरु माउली बंगला, गोरक्षनगर, म्हसरुळ) अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी, गुरुवार (दि.२४) सव्वाच्या सुमारास विश्वास यशवंत भट हे त्यांच्या पत्नी आशा भट यांना घेऊन त्यांच्या टीव्हीएस स्कुटी (एमएच १५ युआर २९६२) हिच्यावरुन मखमलाबाद कडून ड्रीम कॅसल सिग्नलकडून जात असतांना विठ्ठल रुक्मीणी मंगल कार्यालयाजवळ पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यात, आशा भट यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उड्डाण पूलाजवळ रस्त्याच्या कडेला चारचाकीच्या धडकेत पादचारी प्रवाशाचा मृत्यु
नाशिक – मुंबई आग्रा महामार्गावर अंबड शिवारात उड्डाण पूलाजवळ रस्त्याच्या कडेला चारचाकीच्या धडकेत पादचारी प्रवाशाचा मृत्यु झाला. धाम ज्ञानू चोरमारे (वय ४७) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास उड्डाणपुलावर रस्त्याच्या कडेने चालले असतांना हा अपघात झाला. भरधाव कारने दुभाजकावरुन चाललेल्या पादचाऱ्याला जोरात धडक दिली. त्यात त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली