नाशिक – मित्राच्या मित्राने घरातून लॅपटॉप चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे तो पाहुणा म्हणून दोन दिवस राहयला आला होता. पण, त्याने त्याने पाहुणचार घेऊन थेट लॅपटॅापच लंपास केला. दर्शन संजय पाचपांडे (वय २१, बद्री प्लॅट गणपती मंदीराजवळ, भुसावळ) असे संशयिताचे नाव आहे. हर्षल रविंद्र सोनजे (वय २०, सरस्वती नगर आडगाव) यांच्या तक्रारीवरुन आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी हर्षल सोनजे सरस्वतीनगरला रहायला आहे. १८ मार्चला हर्षलचा मित्र देवेश महाजन याचा मित्र संशयित दर्शन पाचपांडे हा हर्षलकडे दोन दिवस रहायला आला. त्याने घरात माळ्यावरील बॅग मध्ये ठेवलेला एमआय नोटबुक नवा लॅपटॉप चोरुन नेला.