नाशिक – पोलिसांची परवानगी न घेता सैलानी बाबा दर्ग्यावर संदल भरविला म्हणून चौघांविरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेलरोडवर हा संदल भरविण्यात आला होता. भरत नारायण ढोले, संदीप विभू खरोटे,दिनेश दादा पाटील, प्रसाद पांडुरंग जामखिंडीकर (जेल रोड) अशी संशयितांची नावे आहे. पोलिस हवालदार विशाल वसंत साळुंखे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी (ता.२४) जेल रोडला सैलानी बाबा दर्गा येथे देउबाई कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेतर्फे चौघा संशयितांनी संदल कार्यक्रमाचे नियोजन केले होते. पोलिसांची परवानगी न घेता संदल कार्यक्रमाचे नियोजन करीत गर्दी जमविली म्हणून गुन्हा करण्यात आला आहे.