नाशिक : घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ४ लाख ९ हजाराची रोकड लंपास केल्याची घटना द्वारका परिसरातील धम्मनगर येथे घडली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुज्जमील बशिर शेख (रा.हरीस्मृती सोसा.टाकळीरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शेख कुटूंबिय मंगळवारी बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेली ४ लाख ९ हजार रूपयांची रोकड चोरून नेली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मोहिते करीत आहेत.