नाशिक – शहापूर आगारात कार्यरत असलेल्या एका एसटी कर्मचाऱ्याने नाशिकमध्ये आत्महत्या केली. शिवनाथ फापाडे असे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. गेले आठ वर्षापासून फापाडे एसटी महामंडळात एसटी ड्रायव्हर म्हणून काम करत होते. बुधवारी सकाळी ही घटना घडली. फाफाडे यांनी आर्थिक विवंचनेतुन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच आगाराच्या अन्य कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी डेपोत धाव घेतली. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. गेल्या चार महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे विलगीकरणासाठी आंदोलन सुरू आहे. विलगीकरण व्हावे ही फापाडे यांची इच्छा होती. मात्र विलगीकरणासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने कर्मचारी तणावात आहेत. त्यातूनच अनेक ठिकाणी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे.