नाशिक – औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल चौकाजवळ खुशाल ट्रान्सपोर्ट भागात सावकारांच्या जाचाला कंटाळून एकाने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी तिघा सावकारांवर गुन्हा दाखल झाला आहे. अरुण बोधले, विजय लहामगे, चंद्रेश लोढया अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी प्रणाली दिलीप रौंदळ (वय १९, तलाठी कॉलनी, तारवालानगर म्हसरुळ) या युवतीच्या तक्रारीवरुन तिघा सावकारावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी दिलीप दयाराम रौंदळ (वय ४० ) यांनी सोमवारी मार्चला सव्वा नऊच्या सुमारास औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल चौकाजवळ खुशाल ट्रान्सपोर्ट भागात विष घेउन आत्महत्या केली होती. मृत दिलीप यांनी तिघा संशयितांकडून घेतलेल्या पैशाच्या वसूली पोटी तिच्या वडिलांनी मानसिक व शारीरीक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.