नाशिक – गंगापूर, भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील सात उपद्रवी गावगुंडाना तडीपार करण्याची कारवाई पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी केली आहे. समाजात उपद्रवी ठरणा-या, गँग तयार करणा-या व शरिर आणि मालमत्ते विरूध्द दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर थेट हद्दपारीची कारवाई करण्यात येत आहेत. या सर्वांची चौकशी सुरू होती. या चौकशीवर आज शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तडीपार केलेल्या सात पैकी चार जणांना प्रत्येकी एक वर्ष तर उर्वरीत तिघांना दोन वर्षासाठी शहर आणि जिह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तडीपार केलेल्यामध्ये रविंद्र उर्फ माया दामोदर गांगुर्डे (२२ रा.कार्बन नाका,सातपुर), सिध्दार्थ गौतम सोनकांबळे (२५ रा.भिमवाडी, भद्रकाली),मोहम्मद अनवर सय्यद (२७ रा. नानावली,भद्रकाली),विक्की उर्फ सुरज तानाजी पवार (२० रा.पंचशिलनगर,गंजमाळ) आदींना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे प्रत्येकी एक वर्षासाठी तर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे अक्षय रामपाल लोट (२१ रा. कथडा,भद्रकाली),करण राजू लोट (२२ रा.महालक्ष्मी चाळ,भद्रकाली) व अर्जुन राजू लोट (२१ रा.महालक्ष्मी चाळ,भद्रकाली) आदींना प्रत्येक दोन वर्षासाठी शहर व जिह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.