सातपूर औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घरफोडीत चोरट्यानी सुमारे ६७ हजाराच्या ऐवज केला लंपास
नाशिक : सातपूर औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यानी सुमारे ६७ हजाराच्या ऐवज लंपास केला. यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेस आहे. मनोज रघूनाथ पाटील (रा.भवानी चौक,अभ्यासिकेजवळ शिवाजीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील कुटूंबिय शनिवारी बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेल्या डब्यातील ३ हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६७ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुर्यवंशी करीत आहेत.
शहरात तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना
नाशिक : शहरात तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी म्हसरूळ,उपनगर व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना नाशिकरोड येथील बिटको कॉलेज पाठीमागे घडली. दत्तात्रेय शंकर शालिग्राम (रा.हिरापन्ना सोसा.गायखे कॉलनी) यांची एमएच १५ एफक्यू ८१७ ही दुचाकी शनिवारी (दि.१९) रात्री त्यांच्या घरासमोर लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.दुस-या घटनेत पेठरोड भागातील मधुकर जयराम बागुल (रा.शिवलिला बिल्डीग,राऊ हॉटेल मागे,आकाशनगर) यांची एमएच १५ बीबी १९६२ दुचाकी गेल्या ३ मार्च रोजी रात्री त्यांच्या बिल्डींगच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत. तिस-या घटनेत मंगेश केशवराव पाटील (रा.शिवाजी उद्यान रो हाऊस,पळसे) यांनी युनिकॉर्न एमएच १५ सीएच ६२९० दुचाकी गेल्या १० मार्च रोजी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक ठेपणे करीत आहेत.