नाशिक : रिक्षात बसून गावठी दारू विक्री करणा-या दोघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे शिवारात करण्यात आली. या कारवाई अॅटोरिक्षासह गावठी दारू असा सुमारे ५० हजाराचा ऐवज जप्त करण्यात आली असून,याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल संजय भदरगे (२० रा. बुद्धविहार जवळ, गरवारे पॉइंट) व संदिप युवराज सैदाणे (२५, रा. दत्तनगर, चुंचाळे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार चुंचाळे येथील कारगील चौकात रिक्षामधून गावठी दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.१९) सायंकाळी पोलीसांनी सापळा लावला असता संशयीत पोलीसाच्या जाळयात अडकले. रिक्षा तपासणीत संशयीतांच्या ताब्यात सुमारे ३०० रूपये किमतीची दहा लिटर गावठी दारू मिळून आली. याप्रकरणी पोलीस नाईक किरण गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक गवळी करीत आहेत.