नाशिक : गोदाकिनारी फिरत असताना तोल जाऊन पाण्यात पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सोनूकुमार रावत (वय ३५, रा. ध्रुवनगर, सातपूर, नाशिक) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोनूकुमार हा काल दुपारी गोदावरी नदीच्या किनारी नातेवाईक पुतीनकुमार, सखा रावत व अर्जुनलाल छोटेलाल कोल यांच्याबरोबर फिरायला गेले होते. यावेळी फिरत असताना सोनूकुमार याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस नाईक झनकर करीत आहेत.









