नाशिक – सहाव्या मजल्यावरुन पडल्याने मजूर महिलेचा मृत्यु; ठेकेदार विरोधात गुन्हा दाखल
नाशिक – सहाव्या मजल्यावरुन पडल्याने मजूर महिलेचा मृत्यु झाल्याची घटना पाथर्डी शिवारात घडली. याप्रकरणी ठेकेदार संदीप सुरेश पंडीत (रतनपुरा, बिहार) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. सुवाली राकेश चौहान (वय १८, गढवाल, बडवानी मध्यप्रदेश) मृत महिलेचे नाव आहे. पाथर्डी शिवारात गजरा नंदनवन बांधकाम साईटचे काम सुरु आहे. तेथे संदीप पंडीत या ठेकेदाराने काहीच सुरक्षेची काळजी न घेता कामकाज चालविले असून संरक्षक जाळ्या लावलेल्या नाहीत. त्यामुळे सहाव्या मजल्यावर रेती वाहून नेतांना तोल गेल्याने युवतीचा मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रेशमा मधूबन हॉटेलमध्ये बिहार येथील युवकाने केली आत्महत्या
नाशिक – रेशमा मधूबन हॉटेलमध्ये बिहार येथील युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या आत्महत्येप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुनीलकुमार नानकू चौधरी (वय २४, बार्टीसलीगंज जिलवादा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. शुक्रवारी साडे आठला हॉटेल रेश्मा मधुबन हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर संडास बाथरुमकडे जाणाऱ्या पॅसेज मध्ये छताच्या लोखंडी हुकला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.