नाशिक – शहरातील वेगवेगळ्या भागातून दोन महिला बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहे. पहिल्या घटनेत सातपूर येथील पुजा संदीप माळी (वय २१, श्रमिकनगर सातपूर) ही महिला सहा महिन्याची वंशिका या मुलीसह काल शुक्रवारी साडे अकराला राहत्या घरातून सातपूर गावात जाते असे सांगून निघून गेली. ती अद्याप घरी परतली नसल्याची तक्रार त्यांची नणंद सुनिता साहेबराव माळी यांनी केली आहे. या तक्रारीवरुन सातपूर पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. दुस-या घटनेत कोमल समाधान जाधव (वय २३, वणी खुर्द) हि महिला औरंगाबाद येथून निघून चार वर्षाच्या मुलगा शिवराज याच्यासह नाशिकला नांदूर नाक्यावर उतरल्या नंतर बेपत्ता झाली. या प्रकरणी पती समाधान कारभारी जाधव यांनी तक्रार केली आहे. या घटनेची पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे