नाशिक : रेडक्रॉस समोरील आंबेडकर कॉलनीत महापालिका कर्मचारी वसाहतीतील घर फोडून चोरट्यांनी सुमारे १५ हजाराच्या ऐवज लंपास केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत रोकडसह संसारोपयोगी वस्तू चोरट्यांनी चोरुन नेले. संजय हरिश बाबरिया (रा.हनुमानवाडी,मखमलाबादरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बाबरिया महापालिका कर्मचारी असून त्यांचे आंबेडकर कॉलनीतील बिल्डींग नं. १ मध्ये शासकिय घर आहे. अज्ञात चोरट्यांनी १२ ते १७ मार्च दरम्यान त्यांचे शासकिय घर फोडून डब्यातील ८ हजार ९०० रूपयांची रोकड, सोन्याचे कानातले आणि संसारोपयोगी वस्तू असा सुमारे १४ हजार ४०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलीस नाईक महाले करीत आहेत.