अंबडला गौणखनीजाची चोरी
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्याच्या आवारातून चोरट्यांनी गौणखनीजाची चोरी केली. लॉकडाऊन मुळे कारखाना बंद असल्याची संधी साधत भामट्यांनी तब्बल साडे १९ लाख रूपये किमतीचा मुरम खोदकाम करून चोरीन नेला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीसह महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास प्रभाकर अहिरे (रा.पंचवटी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ही घटना औद्योगीक वसाहतीतील हिंदूस्थान पारर्सन्स लि. या कारखान्याच्या आवारात घडली. लॉकडाऊनमुळे कारखाना बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी ३ मार्च ते २ जून दरम्यान आवारातील २५० ब्रास सुमारे १९ लाख ३८ हजार ५०० रूपये किमतीचा मुरूम कंपनीची अथवा महसूल विभागाची परवानगी न घेता परस्पर खोदून नेला आहे. अधिक तपास सहायक निरिक्षक कोल्हे करीत आहेत.
….
बांधकामावरून लोखंडी साहित्य चोरी
नाशिक : बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणावरून चोरट्यांनी लोखंडी साहित्याची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. द्वारका भागात ही घटना घडली असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संतोष अशोक वाळूंज (रा.महादेव कॉलनी,मखमलाबाद रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. वाळूंज यांच्या दिप्ती कन्स्ट्रक्शनची ट्रॅक्टर हाऊसच्या बाजूला नवीन बांधकाम साईट सुरू आहे. या बांधकामावर ठेवलेल्या लोखंडी अँगल व सी चॅनल पोल असा ४० हजाराचे साहित्या चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि.२) रात्री घडली. अधिक तपास पोलीस नाईक आहिरे करीत आहेत.
….