नाशिक – मालवाहू पिकअपची स्टेपनी चोरणारा पोलिसांच्या जाळयात; नागरिकांच्या सतर्कतेमुळे उधळला डाव
नाशिक : मालवाहू पिकअपची स्टेपनी चोरणारा पोलिसांनी हाती लागला आहे. पण, त्याचे दोन साथीदार फरार झाले आहे. नागरीकांनी या चोरांचा डाव उधळून लावल्यामुळे चोरांचा हा प्लॅन फेल झाला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन सुदाम पिंपळे (१९ रा.विंचूर दळवी ता.जि.नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. तर अजित दत्तात्रेय दळवी आणि गणेश ज्ञानेश्वर शिरसाठ हे त्याचे साथीदार पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. याप्रकरणी संदिप बाळासाहेब बोराडे (रा.बोराडे वस्ती, दोनवाडे कारखानारोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. कारखाना रोड भागात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. पार्क केलेल्या दुचाकींसह चोरट्यांकडून चारचाकी वाहनातील वस्तू आणि स्टेपनी लांबविली जात आहेत. मंगळवारी रात्री बोराडे यांच्या घरासमोर पार्क केलेल्या पिकअप मधून चोरट्यांनी स्टेपनी लांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र बोराडे कुटूंबियांनी वेळीच धाव घेतल्याने एक चोरटा हाती लागला. त्याचे दोन साथीदार पसार होण्यात यशस्वी झाले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. अधिक तपास हवालदार बकाल करीत आहेत.
पंचवटीतील राठीचाळीत एकाची आत्महत्या
नाशिक : पंचवटीतील राठीचाळीत राहणा-या एकाने बुधवारी आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. संतोष मनोहर क्षिरसागर (४३ रा. राठीचाळ,रघूविर बिल्डींग जवळ) असे मृत इसमाचे नाव आहे. क्षिरसागर यांनी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये छताच्या लोखंडी पाईपाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत दीपक क्षिरसागर यांनी दिलेल्या खबरीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार वनवे करीत आहेत.