नाशिक – पार्टीला बोलावून त्रिकुटाने केली बेदम मारहाण; स्क्रॅप विक्रीच्या वादातून घडली घटना
नाशिक : मिना ट्रेंडर्स दुकानापाठीमागे पार्टीला बोलावून घेत त्रिकुटाने एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. हा वाद स्क्रॅप विक्रीच्या कारणातून झाला. याघटनेत लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आल्याने सदर इसम जखमी झाला असून, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय तिवारी व त्याचे दोन साथीदार अशी मारहाण करणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी सुदर्शन नरेश झा (३८ रा.प्रशांतनगर,पाथर्डी फाटा) यांनी तक्रार दाखल केली आहे. विजय तिवारी या संशयीताने गेल्या गुरूवारी (दि.१०) झा यांना पार्टीसाठी मिना ट्रेंडर्स या दुकाना पाठीमागे बोलावले होते. झा घटनास्थळी गेले असता तिघा संशयीतांनी स्कॅ्रप विक्रीच्या कारणातून त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. त्यातील एकाने लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने झा यांच्या उजव्या पायास व कपाळावर दुखापत झाली असून अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत.
वर्कशॉप मधून तांब्याचे कंडक्टर चोरीला
नाशिक : अंबड औद्योगीक वसाहतीत कारखान्याच्या उघड्या वर्कशॉप मधून चोरट्यांनी तांब्याचे कंडक्टर चोरून नेल्याची घटना घडली. रामजी अनिल पांण्डेय (रा.पर्ल पार्क समोक चुंचाळे शिवार) यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाण्डेय दातीर मळा भागात असलेल्या तिरूपती एंटरप्रायझेस या कारखान्याचे कामकाज बघतात. दि.१० ते १४ मार्च दरम्यान अज्ञात चोरट्यानी उघड्या वर्कशॉप मध्ये प्रवेश करून सुमारे २५ हजार रूपये किमतीचे व दीड किलो वजनाने चार तांब्याचे तयार कंडक्टर चोरून नेले. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
युवतीने गळफास लावून केली आत्महत्या
नाशिक : आगरटाकळी येथील समता नगर भागात राहणाºया १७ वर्षीय युवतीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सदर तरूणीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मरियम तस्लिम शेख (रा.समतानगर) असे आत्महत्या करणाºया तरूणीचे नाव आहे. मरियम शेख या तरूणीने मंगळवारी (दि.१५) रात्री आपल्या राहते घरी पत्र्याच्या शेडच्या अँगलला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी तिला तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले.अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत.