नाशिक – सिडकोतील सावतानगर भागात राहणा-या १६ वर्षीय युवतीने गळफास घेऊन केली आत्महत्या
नाशिक : सिडकोतील सावतानगर भागात राहणा-या १६ वर्षीय युवतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर तरूणीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिपाली गंगाधर शेळके (रा.शनिचौक,सावतानगर) असे आत्महत्या करणा-या युवतीचे नाव आहे. दिपाली शेळके हिने अज्ञात कारणातून सोमवारी (दि.१४) आपल्या राहत्या घरी पंख्याच्या हुकास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात तीचा मृत्यू झाला. याबाबत देवेश शेळके यांनी खबर दिल्याने अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक अतुल बनतोडे करीत आहेत.
विषारी औषध सेवन करून आत्महत्या
नाशिक – द्वारकापरिसरातील ट्रॅक्टर हाऊस भागात राहणा-या ३७ वर्षीय व्यक्तीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रमोद रामचंद्र नरवडे (रा.आशियाना बिल्डींग,निवृत्ती कॉम्प्लेक्स समोर) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. नरवाडे यांनी सोमवारी (दि.१४) सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच वडिल रामचंद्र नरवाडे यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक शेख करीत आहेत.
चक्कर येवून पडल्याने ६४ वर्षीय वृध्दाचा मृत्यू
नाशिक : राहत्या घराच्या गॅलरीतून चक्कर येवून पडल्याने ६४ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. ही घटना सिडकोतील पाटील नगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुदाम रूपसिंग पाटील (रा.विशाल चौक,पाटीलनगर) असे मृत वृध्दाचे नाव आहे. पाटील सोमवारी (दि.१४) दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या गॅलरीत चक्कर मारत असतांना ही घटना घडली. अचानक चक्कर आल्याने ते दुसºया मजल्यावरून जमिनीवर कोसळले. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाल्याने रूपसिंग राजपूत यांनी त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता डॉ.राम पाटील यांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक देशमुख करीत आहेत.