नाशिक – शस्त्रकिया दरम्यान अतिरक्तश्राव झाल्याने ३१ वर्षीय महिलेचा मृत्यु
नाशिक : महामार्गावरील एका हॉस्पिटल मध्ये महिलेवर शस्त्रकिया दरम्यान अतिरक्तश्राव झाल्याने ३१ वर्षीय महिलेचा मृत्यु झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कविता विठोबा कासव (रा.पाटे ता.चांदवड) असे मृत महिलेचे नाव आहे. कविता कासव या गर्भवतीस पालखेड ता.निफाड येथील डॉ.मोरेश्वर थेटे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. बाळंतपणात अतिरक्तश्राव झाल्याने तिला गोविंदनगर येथील एरिएस हॉस्पिटल येथे हलविण्यात आले होते. पती विठोबा कासव यांच्या संमतीने रविवारी (दि.१३) तिच्या गर्भपिशवीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. उपचारादरम्यान डॉ.संदिप सोनवणे यांनी मृत घोषित केले. अधिक तपास पोलीस नाईक अतुल बनतोडे करीत आहेत.
घरात पाय घसरून वृध्देचा मृत्यू
नाशिक : औदुंबरनगर भागात घरात पाय घसरून पडल्याने ७० वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात करण्यात आली आहे. यमुनाबाई बाळू झुरडे (रा.बाफना बाजार जवळ,औदुंबरनगर) असे मृत वृध्देचे नाव आहे. झुरडे या शनिवारी (दि.१२) रात्री आपल्या राहत्या घरात पाय घसरून पडल्याने बेशुध्द अवस्थेत त्यांना जिल्हारूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक ठाकरे करीत आहेत.