दोन गायींची चोरी
नाशिकः लॉकडाऊन काळात काही दिवसांपासून नाशिक शहर व परिसरात जनावरे चोरट्यांचा उपद्रव वाढला आहे. देवळाली कॅम्प परिसरातील नाणेगाव येथे चोरट्यांनी रविवारी (दि.३०) रात्री घोट्यातून ८० हजार रूपये किंमतीच्या दोन गायी पळवल्याची घटना घडली. याप्रकरणी प्रसाद विजय मुठाळ (३२, रा. नोणगाव दानवाडेरोड, ता. नाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रविवारी मध्यरात्री मुठाळ यांच्या गोठ्यातून चौघा चोरट्यांनी दोन गायी एमएच १५ जीव्ही ६३४० या पिकअप वाहनातून चोरून नेल्या. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक वारघडे करत आहेत.
…..