नाशिक – महिलेला गुंगीचे औषध देत अत्याचार केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित ललित निकम यास अटक करण्यात आली आहे. या पीडित महिनेले गंगापूर पोलिस स्थानकात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, अत्याचार करून अश्लील फोटो, व्हिडिओ काढत ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केले. हा प्रकार मे २०१९ ते जुलै २०२१ या कालावधीत नाशिक शहरातील विविध भागात घडला. ललीत निकम, जयेश वाघ, नेहा निकम, ज्योती वाघ अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
अटक करण्यात आलेला संशयित ललित निकम हा एन. ललीत मेकअप क्लासेस चालवतो. निकम यांनी पीडित महिलेला कामानिमित्त हॉटेल पंचम जवळ बोलवले. यावेळी फिर्यादी संशयितांच्या स्वीफ्ट डिझायर गाडीत बसलेली असतांना त्यांना कोल्ड्रिंक्स मधून गुंगीचे औषध देण्यात आले. त्यानंतर कॉलेज रोडवरील आर्चिस गॅलरीच्या मागे असलेल्या पराग अपार्टमेन्ट मधील तळ मजल्यावर असलेल्या सलुनमध्ये नेत त्यांच्यावर अत्याचार केला. हा प्रकार मे २०१९ ते जुलै २०२१ या काळात वेळोवेळी झाल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. तसेच अश्लील फोट, व्हिडीओ काढून ते फिर्यादीच्या पतीस पाठवण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केला. यातून मे २०२१ मध्ये गर्भधारणा झाल्याने संशयितांनी सदर गर्भ फिर्यादी यांच्या पतीचा असल्याचे सांगून गंजमाळ येथील हॅास्पिटलमध्ये गर्भपात केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास गंगापूर पोलीस करीत आहेत.