नाशिक – सोशल मीडियावर अनेक फसवणुकीच्या घटना समोर येत असतांना नाशिकच्या एका तरुणाची अशीच फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या तरुणाने फेसबुकवर तरुणीची फ्रेंण्डस रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केल्यानंतर दोन दिवसांनंतर या तरुणीने तरुणाचा व्हॅाटसअॅप नंबर घेतला. त्यानंतर तीने या नंबरवर व्हिडीओ कॉल केला. या व्हिडीओ कॉल मध्ये एक महिला विवस्त्र अवस्थेत बसून अश्लिल हावभावाचे कृत्य करत होती. यावेळी हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात येत होता. सदर तरुणास हा व्हिडीओ व्हायरल करण्याची व फेसबुक वरील मित्रांना पाठविण्याची धमकी दिली. तसेच सदर व्हिडीओ इतरत्र न पाठविण्याची धमकी देऊन गुगल पे वर वारंवार पैशांची मागणी केली. त्यानंतर या तरुणाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या फसवणूक प्रकरणी त्याने पोलिसांकडे धाव घेतली असून सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पूनम शर्मा नावाच्या महिलेची ही रिक्वेस्ट असल्याचे समोर आले आहे.