नाशिक – पंचवटी येथील महिलेची १९ लाख,७७ हजारांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सुजाता शिरसाठ यांनी आठ संशयितांविरुदध पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ७ डिसेंबर २०१८ ते १३ मार्च २०१९ या कालावधीत ही फसवणूक झाली आहे. तुम्हाला १ कोटी रुपयांची लॉटरी लागली असून त्यासाठी टॅक्स भरावा लागेल असे मोबाइल वर सांगत या आठ संशयितांनी ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी ९ मार्च २०२२ रोजी राजेंद्र भारद्वाज, विजय नारायण, दिनेश मेन,सोनिया,दिव्य वर्मा,राहुल सिंग,राकेश कुमार, सुनील यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .ही रक्कम वेळोवेळी संशयितांनी त्यांच्या बँक खात्यावर मागवली असे फिर्यादी मध्ये नमूद केले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक चोपडे या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.