नाशिक – सरकारवाडा पोलीसांनी कापडणीस पिता-पुत्र हत्याकांडातील मुख्य संशयित राहुल जगताप याच्या तीन साथीदारांना गजाआड केले आहे. हे तिन्ही साथीदार औरंगाबाद शहरात पोलीसांच्या हाती लागले. विकास हेमके, प्रदिप शिरसाठ आणि सुरज मोरे अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने सोमवार (दि.१४) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कापडणीस हत्याकांडातील मुख्य संशयित राहुल जगताप याने तीन साथीदारांच्या मदतीने हे हत्याकांड केल्याचे समोर आल्याने पोलीस या त्रिकुटाच्या मागावर होते. सरकारवाडा पोलीसांची तीन पथकांनी राज्यातील ठिकठिकाणी शोध घेतला मात्र ते हाती लागत नव्हते. मंगळवारी त्यातील एक जण नांदेड येथून वाळूंज एमआयडीसीत दाखल झाल्याची माहिती मिळताच पथके औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले होते. पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले असता उर्वरीत दोघेही पोलीसांच्या हाती लागले असून न्यायालयाने त्यांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
..