नाशिक – नाशिक रोड येथे कुरियर मालाची वाहातूक करणा-या पिकअप वाहनातून चोरटयांनी महागडे ४० मोबाईल लंपास केले आहे. संदीप चंद्रभान ठेपे (४३, रा. नागरे मळा, पाथर्डी फाटा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ठेपे कुरीअर वितरणाचे काम करतात गुरूवारी (दि.३) त्यांनी आपली पिकअप (एमएच १५ जीव्ही ६१५०) लोड करून डिलेव्हरीसाठी नाशिकरोड भागात गेले असता ही घटना घडली. साडे बारा वाजेच्या सुमारास ते शिवाजी पुतळा भागात कुरीअर पोहच करण्यासाठी गेले असता पाठीमागील दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्यांनी सुमारे २ लाख १४ हजार रूपये किमतीचे ४० मोबाईल आणि ४ स्मार्ट वॉच असलेली कुरीअर बॉक्स चोरून नेले. हे बॉक्स धुळे येथे पोहचविण्यात येणार होते. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत.