महिलेचा विनयभंग
नाशिकः घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत अश्लिल बोलत अंगलट करून एकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना नवीन नाशिकच्या अभियंतानगर परिसरात घडली. नवल हरदास राठोड (४७, रा. अभियंतानगर, नवीन नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारी सायंकाळी पीडिता ही घरी एकटीच असल्याचा गैरफायदा घेत जवळ राहणारा संशयित हा घरात घुसला. त्याने अश्लिल बोलत अंगलट करून महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार शेख करत आहेत.
…..