नाशिक : ध्रुवनगर भागात बांधकाम साईटवरील सहाव्या मजल्यावर पाणी मारत असतांना तोल जावून पडल्याने २५ वर्षीय कामगार महिलेचा मृत्यु झाल्याची घटना घडली. रूख्मीनी पिराजी बोळे (रा.बबन लॉन्स समोर,ध्रुवनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. बोळे या मंगळवारी (दि.८) ध्रुवनगर येथे राजेंद्र सोनजे यांच्या बांधकाम साईटवर पाणी मारण्याचे काम करीत असतांना ही घटना घडली. सहाव्या मजल्यावर ती पाणी मारत असतांना अचानक तोल जावून जमिनीवर कोसळली होती. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने सुपरवायझर जितेंद्र माने यांनी तिला तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक बागुल करीत आहेत.