नाशिक -पंचवटीत गॅस लिक होवून झालेल्या गिझरच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या वृध्दाचा उपचार सुरू असतांना मृत्यु
नाशिक : पंचवटीत गॅस लिक होवून झालेल्या गिझरच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ६८ वर्षीय वृध्दाचा बीड येथे उपचार सुरू असतांना मृत्यु झाला. याप्रकरणी पंचवटी सुभाष गणेश कुलकर्णी (रा.रेवा स्वामी अपा.पंचवटी) असे मृत वृध्दाचे नाव आहे. कुलकर्णी ३० जानेवारी रोजी आपल्या घरातील बाथरूममध्ये आंघोळ करीत असतांना ही घटना घडली होती. गॅस लिक झाल्याने गिझरमध्ये भडका उडला होता. या घटनेत कुलकर्णी ७५ टक्के भाजले होते. कुटूंबियांनी त्यांना तातडीने येथील संजिवणी हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ बीड येथील बेंबडे हॉस्पिटल येथे दाखल केले होते. उपचारा दरम्यान १ मार्च दरम्यान त्यांचा मृत्यु झाला.या प्रकरणी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार सोर करीत आहेत.
दादागिरी करून शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक – औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात दादागिरी करून शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाण प्रकरणी पोलीसांनी प्रदीप राधाकृष्ण नायर ( ३८,रा. जानकी हाईटस, शिवाजीनगर) याला अटक केली आहे. या मारहाणीची अनिल हिरामण गायकवाड (४९ रा. भुवनेश्वरी अपा. लामखेडे मळा) यांनी तक्रार दाखल केली आहे. गायकवाड मंगळवारी (दि.८) शिवनगर येथील पत्नीच्या घरी गेले असता ही घटना घडली. दुपारच्या सुमारास आलेल्या संशयीताने दादागिरीने गायकवाड यांच्या पत्नीच्या घरात प्रवेश केला. यावेळी गायकवाड यांनी जाब विचारला असता संशयीताने शिवीगाळ करीत त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत गायकवाड यांचे अंगावरील कपडे फाडून टाकत संशयीताने दमदाटी केल्याचे गायकवाड यांनी तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पटारे करीत आहेत.