नाशिक– शहरात दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. मुंबई नाका व म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत या दोन घरफोड्या झाल्या आहे. पहिल्या घटनेत मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिरण संतोष गांधी ( ३९ ,रा.फ्लॅट नंबर ७०३, अमोदिनी सोसायटी, शिंगाडा तलाव, नाशिक ) यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून ३ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दोन मंगळसूत्र लंपास केले. या चोरीप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर म्हसरूळ येथे घटलेल्या दुस-या घटनेत श्रीकृष्ण जिभाऊ शार्दुल ( ३७, रा. फ्लॅट नंबर १५, भाग्यश्री अपार्टमेंट, पुष्प विनायक गणपती मंदिर, प्रभात नगर, म्हसरूळ, दिंडोरी रोड, नाशिक ) यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून बेडरूममध्ये टेबलच्या लॉकरमध्ये ठेवलेले दोन लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केले. याप्रकरणी प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.