नाशिक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली व दहा हजार रूपयाचा दंड ठोठावला. सचिन मुरलीधर सोनवणे (रा.वाघाडी,पंचवटी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा खटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश डी. डी. देशमुख यांच्या कोर्टात चालला. सरकार तर्फे अॅड. दिपशिखा भिडे यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अधिका-यांनी सादर केलेले परिस्थिती जन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस ही शिक्षा सुनावली. सचिन मुरलीधर सोनवणे (रा.वाघाडी,पंचवटी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
.
नोव्हेंबर २०१८ मध्ये तेरा वर्षीय अल्पवयीन पीडिता दिवाळीच्या सुट्टीनिमित्त आपल्या घरात एकटी असतांना ही घटना घडली होती. घरात कुणी नसल्याची संधी साधत नात्यातील आरोपीने तिच्या अज्ञानपणाचा फायदा उचलत बळजबरीने बलात्कार केला होता. यावेळी त्याने कुणास याबाबत सांगितल्यास काकाच्या लहान मुलीवर असे कृत्य करण्याची धमकी दिल्याने पीडितेने वाच्यता केली नाही. मात्र त्यानंतर त्याचे येणे जाणे वाढले. या काळात त्याने मुलीवर बळजबरीने वेळोवेळी बलात्कार केला. यातून मुलगी गर्भवती राहिली. २६ सप्टेंबर २०१९ रोजी तिला जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता तिने स्त्री जातीच्या बाळाला जन्म दिला. कुमारी मातेचा प्रकार समोर आल्याने मुलीच्या तक्रारीवरून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक जयश्री अनवणे यांनी करून सबळ पुराव्यानिशी दोषारोपपत्र विशेष पोक्सो न्यायालयात दाखल केले.