नाशिक – कोणार्क नगर येथे सप्टेंबर २०२१ सयाजी पॅलेस जवळील कस्तुरी ज्वेलर्स वर दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या टोळीने पोलिसांची चाहुल लागताच पलायन केले. या दरोडेखोरांना आडगाव पोलिसांनी सहा महिन्यानंतर गजाआड केले आहे. उत्तरप्रदेश येथील ककराला येथे संशयितास ताब्यात घेतले असून त्याचा एक साथीदार अद्याप फरार आहे.फहिमबाबू समशेर खान, झिशान खान उर्फ इर्शाद खान, रफत अली उर्फ पप्पू अश्रफ अली, तेहजीब आलम उर्फ फरसाद अशी अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नावे आहेत.
हे दरोडेखोर पोलिसांची चाहूल लागताच सदरच्या गाडीसह हत्यार सोडून पळून गेले होते. पण, आडगाव पोलिसांच्या पथक या पळून गेलेल्या दरोडेखोरांचा शोध सुरुच ठेवला होता. काही दिवसांपूर्वी सदर संशयित आरोपी हे ककराला (ता. दातागंज जि. बदायूँ उत्तर प्रदेश) या भागात असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली त्यानुसार आडगाव पोलिसांचे एक पथक उत्तर प्रदेश कडे रवाना झाले होते. सदर पथकाने या संशयित आरोपींना ककराला (ता. दातागंज जि. बदायू) येथे शिताफीने सापळा रचून अटक केली आहे. या टोळीतील एक साथीदार अद्याप फरार असून यातील तेहजीब आलम ऊर्फ फरसाद कल्लू खान हा सराईत गुन्हेगार असून आंतरराज्य बँक एटीएम गॅस कटरच्या साह्याने तोडणाऱ्या टोळीचा तो मुखीया असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्ह्यांमधील फरार आरोपीचा पोलीस शोध घेत असून अटक केलेल्या संशयितना कोर्टाने तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.