नाशिक – फ्रांस व इटली येथील शिक्षणासाठी अॅडमिशन तसेच व्हीसा स्कॉलरशिपचे सर्व प्रोसेस पूर्ण करून देण्याच्या नावाखाली एकाने तीन लाखाला गंडा घातल्याचे समोर आले आहे. या फसवणूक प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूकीचा गुन्हा करण्यात आला आहे. पंचवटीत राहणाऱ्या नारायण दगू शिंदे यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत शिंदे यांनी म्हटले आहे की, माझा मुलगा प्रितेश हा शहरातील इंग्लिश लर्निंग अकॅडमी अँन्ड स्टडी अॅब्रॉड कन्सलटन्सी येथे शिकतो. या संस्थेच्या पदाधिकारी रागिनी प्रफुल्ल सोमठाणकर यांनी मुलाचे अॅडमिशन करून देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक केली. परदेशातील शिक्षणाची सर्व प्रोसेस पूर्ण करून देण्याचे कबुल केले. हे प्रवेश करून देण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळया तारखेस टप्याटप्याने गुगल पे व ऑनलाईन पद्धतीने एकुण २ लाख ८० हजार रूपये घेतले. मात्र मुलाचे परदेशात अॅडमिशनचे काही एक प्रोसेस केली नाही. अॅडमिशन बाबत विचारले असता सोमठाणकर यांनी तुमच्या मुलाचे अॅडमिशन रिजेक्ट झाले आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे भेटणार नाही. यानंतर आमच्यामध्ये वाद झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शिंदे यांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी गंगापूर पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.