नाशिक – पंचवटीतील फुलेनगरमधील गजानन चौकात घरात घुसून महिलेचा विनयभंग
नाशिक – पंचवटीतील फुलेनगरमधील गजानन चौकात घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. यातील मुख्य संशयित पप्पू कातारीविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गभीर गुन्हे दाखल आहे. या सराईताने जातीवाचक शिवीगाळ केल्याची तसेच कोयत्याचा धाक दाखवत जबरीने ऐवज घेऊन नेत्याचे पीडित महिलने सांगितले आहे. पप्पू कातारी उर्फ भोंड, भरत कातारी उर्फ भोंड (कातार गल्ली, गजानन चौक, फुलेनगर), रवी, छोटू अशी संशयितांची नावे आहेत. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी रात्री त्या घरात पतीसह जेवण करत असतांना संशयित जबरीने घरात शिरले. त्यानंतर दीर अक्षय याच्याशी झालेल्या जुन्या भांडणाची कुरापत काढून पीडितेच्या पतीला लाथाबुक्क्यानी मारहाण केली. पीडिता सोडवण्यास गेली असता अंगावरील गाऊन फाडून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या झटापटीत मंगळसूत्र तसेच पगाराची रक्कम असलेले पाकीट खाली पडल्यावर जबरीने उचलून घेतले. कोयत्याचा धाक दाखवत पीडिता तसेच दोन्ही सासूंना शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीन्वये पंचवटी पोलिसांनी संशयितांविरुद्ध विनयभंग,जबरी चोरी, अनुसूचित जाती जमाती अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
अमरधाम रोडवरील शिवाजी चौकात तरूणीचा विनयभंग
नाशिक : अमरधाम रोडवरील शिवाजी चौकात घरात घुसून तरूणीचा एकाने विनयभंग केल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत एकतर्फी प्रेमातून संशयीताने विषारी औषध सेवन करण्याची धमकी दिल्याने युवतीने पोलीस स्थानकात धाव घेतली. प्रितम ठाकरे (२१ रा.शिंप्पी गल्ली,शिवाजीचौक) असे संशयीताचे नाव आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास युवती आपल्या घरात एकटी असल्याची संधी साधत प्रितमने घरात प्रवेश करीत तरूणीचा विनयभंग केला. यावेळी युवतीने त्यास चांगलेच फटकारले असता त्याने सोबत आणलेल्या बाटलीतील लिक्वीड सेवन केले. यावेळी त्याने मरण्याची धमकी दिल्याने तरूणीने पोलीसात धाव घेतली. पीडीता आणि संशयीत एकाच परिसरात वास्तव्यास असून, गेल्या तीन वर्षापासून तो एकतर्फी प्रेमातून युवतीचा पाठलाग करीत होता. या काळात त्याने तरूणीच्या मोबाईलवर संपर्क साधून माझे तुझ्यावर प्रेम आहे.. माझ्याबरोबर लग्न कर अशी गळ घालत होता. परंतू तरूणीने त्याकडे दुर्लक्ष केले होते.