नाशिक – पोलिसांच्या विरोधात फेसबुक लाईव्ह केल्याप्रकरणी रोहन यशवंत देशपांडे याला गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक १ च्या टीमने पुणे जिल्ह्यातील देहू आळंदी येथे सापळा रचत अटक केली .दरम्यान त्याला न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली व त्याचा जामीन मंजूर केला.
दरम्यान देशपांडे याचा जामीन मंजूर होताच अशाच प्रकारच्या एका गुन्ह्यांमध्ये सरकारवाडा पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याने सरकारवाडा पोलिसांनी त्याला अटक केली. तसेच त्याच्या घराची झाडझडती घेतली. यामधे तीन पेनड्राईव पोलिसांनी जप्त केले असून सरकारवाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.
फेसबुक लाईव्ह केल्याप्रकरणी देशपांडे याच्यावर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे शाखेने देहू आळंदी येथे अटक केलेल्या रोहन देशपांडे च्या घराची पोलिसांनी झाड झडती घेतली. दरम्यान त्यात पोलिसांना दोन पेन ड्राईव्ह आढळून आले असून याबाबत पुढील तपास सुरू आहे.