नाशिक – घरात घुसून तलवार, लोखंडी पाईपने घरात साहित्याची मोडतोड; सहा जणावर गुन्हा दाखल
नाशिक – घरात घुसून तलवार, लोखंडी पाईपने घरात साहित्याची मोडतोड करीत महिलांना शिवीगाळ करीत त्यांच्याकडील सुमारे दोन लाखांचे दागिणे लुटून नेल्याच्या तक्रारीवरुन सहा जणावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी आशाबाई उत्तम गायकवाड (वय ५२, शिवाजी नगर) यांनी तक्रार केली आहे. या तक्रारीवरुन नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडकवाड यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवारी रात्री जेल रोडला म्हसोबा मंदीराशेजार मनोहर अपार्टमेटमध्ये तलवारी लोखंडी पाईप घेउन घुसले घराचा दरवाजा तोडून घरातील टीव्ही खिडकीच्या काचा सोनी कंपनीचा एलईडी फर्निचरचे नुकसान करीत मुलाला चालत्या रेल्वेतून ढकलून देण्याची धमकी देत बेडरुमधील कपाटात सोन्याचा नेकलेस, सोन्याचे मंगळसूत्र, दोन सोन्याच्या अंगठ्या असा दोन लाखांचा ऐवज चोरुन नेला.
घरफोडीत सुमारे अडीच लाखांचा ऐवज लंपास
नाशिक – नाशिक रोडला चेहेडी शिवारात बनकर मळ्यात चोरट्यांनी घरफोडीत सुमारे अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. या घरफोडीची तक्रार निलेश देसले यांनी दिली आहे. ते १ ते ६ मार्च दरम्यान धार्मीक कार्यक्रमा साठी बाहेरगावी गेले असता, चोरट्यांनी त्यांच्या बेडरुमच्या बाहेर गॅलरीतील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून बेडरुममध्ये प्रवेश करीत लोखंडी कपाटातील स्टीलच्या डब्यातील ३० ग्रॅमची सोन्याची पोत, ८ ग्रॅमचे सोन्याचे कानातील झुंबर, दोन ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या, २५ ग्रॅमचे चांदीचे ब्रेसलेट असा सुमारे २ लाख ३१ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला असून, पोलीस उपनिरीक्षक जी.एम. काकड तपास करीत आहे.