नाशिक – संगमनेर येथील महिला वकीलाला नकली बंदुकीचा धाक दाखवून गळयातील दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना चोपडा लॉन्स रोड वरील भावबंधन मंगल कार्यालयाच्या परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून संदीप लक्ष्मण पाटील (वय ३४, मखमलाबाद रोड पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे. शनिवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. महिला वकील त्यांच्या बाळाला स्तनपान करीत असतांना संशयितांनी त्याच्या साथीदारासह त्यांच्या खोलीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी प्लॅस्टीकच्या खेळण्यातील बंदूक रोखून गळ्यातील १२ ग्रॅमची सोन्याची पोतीचे ४० ग्रॅमचे सोन्याचे पेंडल, ७ ग्रॅमचे सोन्याचे मणी असा ऐवज ओरबडून नेला. याप्रकरणी पुजा गणेश भडांगे (वय २६, कोल्हेवाडी संगमनेर) यांच्या तक्रारीवरुन पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या चोरीप्रकरणातील दुसरा संशयित मात्र फरार झाला आहे.