नाशिक – वाहनचोरी प्रकरणात गंगापूर पोलिसांनी एकाला अटक केली असून राहूल देविदास मुसळे (वय ४४, त्रिमूर्ती चौक,पाटीलनगर सिडको) असे संशयिताचे नाव आहे. हिरो होंडा पॅशन प्रो ही दुचाकी सिटी सेंटर मॉलच्या समोर रस्त्यालावली असतांना २ फेब्रुवारीला संशयिताने दुचाकी चोरुन नेली होती. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. दीपक रामदास जगताप यांनी याचोरीबाबत तक्रार केली होती.
शहरात वेगवेगळया भागात तीन दुचाकीची चोरीला
दुचाकी प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असली तरी शहरात वेगवेगळ्या भागात चोरट्यांनी तीन दुचाकी चोरुन नेल्याच्या घटना घडल्या आहे. पहिल्या प्रकारात मोहन वाळू मुठाळ(वय ३८, लहवित ता.नाशिक) यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर (एमएच१५ ईवाय ४९६०) दुचाकी २० फेब्रुवारीला लहवित भागातील बाजगीरा हॉटेलच्या पार्किंगमध्ये लावली असतांना चोरट्याने दुचाकी चोरुन नेली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दुस-या घटनेत संजय जगन्नाथ बोरदे (४३, विडी कामगार वसाहत,अमृतधाम पंचवटी) यांनी त्यांची बजाज कंनपीची सीटी हंड्रेड (एमएच १५ बीएल २८३४) ही दुचाकी गंगाघाटावर कपालेश्वरमंदीराजवळ लावली असतांना चोरट्याने २८ फेब्रूवारीला दुचाकी चोरुन नेली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या घटनेत अमोलकुमार अशोक राठोड (वय ४१, आनंदनगर, शिवतेज बंगला उपनगर) यांनी त्यांची दुचाकीहिरो होंडा पॅशन प्रो (एमएच १३ बीजे ८७५७) ही गाडी उपनगर येथील आनंदनगर भागात शिवतेज बंगल्यासमोर लावली असतांना चोरट्याने दुचाकी चोरुन नेली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.