नाशिक – तडीपार केलेले असतांना शहरात फिरत असलेल्या सराईताला पोलिसांनी गजाआड केले आहे. नितीन निवृत्ती बनकर (वय २५ रोकडोबावाडी दे.गाव)असे सराईताचे नाव आहे. त्याला २ डिसेंबरला पोलिस उपायुक्तांनी चार महिन्यासाठी हद्दपार केले होते. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सराईत रोकडोबावाडीत वालेदवी पुलावर असल्याची माहीती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली आहे.