सात जणावर कारवाई
नाशिक – विभागीय सह निबंधक कार्यालयासमोर विना परवानगी गर्दी जमवून उपोषण केल्याप्रकरणी सात जणावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यार्तंगत प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांनी केली आहे. शुक्रवारी सकाळी अकराला विभागीय सह निबंधक कार्यालयासमोर सत्तर ते ऐंशी जणांनी एकत्र जमवून आंदोलन करीत उपोषण केले होते. या आंदोलन करणा-यांविरुध्द पोलिस हवालदार ललीत संभाजी केदारे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. सुधीर विलासराव कराड (जळगाव ता.निफाड), पंडीत सुरेश आहेर (पालखेड, ता.निफाड), राजेश चंद्रकांत पाटील (शास्त्रीनगर पिंपळगाव बसवंत), शिवाजी बंडू सुरासे (टाकळी विंचूर, निफाड), अशीष सुधाकर बागूल (पिंपळगाव बसवंत), अशीष बाळासाहेब शिंदे (शिवाजीनगर ओझर निफाड) अमोल बाळासाहेब भालेराव (तिसगाव ता.दिंडोरी) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहे.
….
वेगवेगळ्या भागात प्रतिबंधात्मक कारवाई
नाशिक – सराफ बाजारात पालखी मिरवणूक काढल्याप्रकरणी तसेच सातपूरला विना परवानगी बॅनर लावल्याप्रकरणी वेगवेगळ्या भागात प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. सराफ बाजारात तिळभांडेश्वर महादेव मंदीर परिसरात सराफ बाजारात विना परवानगी पालखी काढल्याप्रकरणी आशुतोष शिवप्रकाश जंगम आणि अवधूत अनिल पिंगळे यांच्यासह दहा ते बारा जणांविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली १ मार्चला महाशिवरात्री निमित्ताने तिळभांडेश्वर महादेव मंदीर परिसरात मिरवणूक काढली होती. सातपूरला राजवाडा भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विना परवानगी पोस्टर बॅनर लावल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला. अनिल शंकर काळे (वय ४४, राजवाडा सातपूर) असे संशयिताचे नाव आहे. काल शुक्रवारी (दि.४) पोलिस आयुक्तांचा विनापरवानगी पोस्टर बंदी आदेश डावलून संशयिताने अनधिकृतपणे बॅनरला लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.
…..