नाशिक – तडीपार करुनही शहरात वावणाऱ्या सराईताला पोलिसांनी केली अटक
नाशिक – तडीपार करुनही शहरात वावणाऱ्या सराईताला पोलिसांनी अटक केली आहे. नावीद उर्फ नाना शफीफ शेख (वय २३,रसूलबाग कब्रस्तान समोर खडकाळी) असे सराईताचे नाव आहे. शहर पोलिसांनी त्याला ९ डिसेंबरला शहरातून एक वर्षासाठी हद्दपार केले होते. शुक्रवारी सराईत घरी असल्याची माहीती मिळाल्यावरुन भद्रकाली पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिस अंमलदार सागर प्रदीप निकुंभ यांच्या तक्रारीवरुन भद्रकालीत गुन्हा दाखल झाला आहे.
चौघांनी शिवीगाळ करीत बेदम मारहाण
नाशिक – भांडण सोडवायला गेलेल्याला चौघांनी शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याची घटना नाशिक पुणे महामार्गावरील पळसे शिवारात घडली. उमेश गायधनी, गोकूळ गायखे, सोनू गायधनी आणखी एक अशी चौघा संशयितांची नावे आहेत. या मारहाणीबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे, गुरुवारी महामार्गावरील बंगाली बाबा जवळील हर्षवधन कॉलनी भागात सागर पोपट जाधव आणि विकास ढेंरीगे यांच्यात बाचाबाची सुरु असतांना तक्रारदार सागर पोपट यादव हा भांडण सोडवायला गेला असता चौघा संशयितांनी त्याला मारहाण केली. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
बापलेकांनी केली मारहाण
नाशिक – हॉटेल कामगारांना मारहाण करणाऱ्याला जाब विचारायला गेलेल्या बापलेकांनी मारहाण केल्याचा प्रकार कमोदनगर कॉर्नरला घडला आहे. तनवीर पठाण (वय ५५) आणि पापा पठाण असे संशयितांचे नाव आहे. जितेंद्र मनोहर जाधव (वय ३०, सदगुरुनगर गोविंदनगर) यांच्या तक्रारीवरुन दोघा संशयिताविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, दोघा संशयितांनी हॉटेलच्या कामगाराला मारहाण केली होती. त्याविषयी जितेंद्र जाधव विचारायला गेले असता, दोघा संशयितांनी त्यांनाही लोखंडी रॉडने मारहाण केली. इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.