नाशिक – मुलीच्या विवाहासाठी जमवलेले सुमारे साडे तीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास
नाशिक – मुलीच्या विवाहासाठी जमवलेले सुमारे साडे तीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. उपनगरला खोडदेनगर भागात ही घरफोडी झाली आहे. पुरुषोत्तम माधव जाधव यांच्या घरी बंद घराचा कडी कोयंडा तोडून ही चोरी केली. या चोरांनी घरात घुसुन मुलीच्या विवाहासाठी बॅकेतून काढलेले ३ लाख ३५ हजार रुपये तसेच लक्ष्मीची चांदीची मुर्ती, देवाचा गेठा असा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
चाडेगावला घरफोडीत एकाला अटक
नाशिक – चाडेगावला घरफोडीच्या संशयावरुन एकाला गजाआड करण्यात आले आहे. करण प्रकाश घुगे (वय २१, देवी रोड ऐर्श्वर्या झोपडपट्टी सिन्नर) असे संशयिताचे नाव आहे. या चोरीप्रकरणी किरण पुंडलिक नागरे (वय २१, चाडेगाव) याच्या तक्रारीवरुन नाशिक रोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी सहाला चाडेगावला जाधववाडी समोरील त्याच्या चुलत भावाच्या शेतात उसतोडी दरम्यान गेले असता. त्याच्या चुलत भावाच्या शेतातील घरात दोघे संशयित लोखंडी कोयत्यासह घरफोडीच्या तयारीत आढळले.