अंडे न दिल्याने दुकानदारावर हल्ला,अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिकः दुकान बंद असताना मद्याच्या नशेत अंडे घेण्यासाठी आलेल्या एकास नकार देताच त्याने दुकानादाराला मारहाण करत टोकदार वस्तुने वार केल्याची घटना चुंचाळेतील दत्तनगर परिसरात शनिवारी दुपारी घडली. सोनु ताठे (पुर्ण नाव नाही) असे हल्लेखोराचे नाव आहे. याप्रकरणी संदिप रामदास धोंडगे (४०, रा. दत्तनगर, चुंचाळे) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार दुपारी बारा वाजता दुकान बंद करून धोंडगे हे घराबाहेर पेपर वाचत बसले असताना ताठे हा मद्याच्या नशेत अंड्यांची मागणी करत होता. दुकान बंद केल्याने अंडे देता येणार नाही असे सांगताच ताठे याने त्यांच्यावर हल्ला करून टोकदार वस्तुने पोटावर ३ वार केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
…