नाशिक – बॅनर लावण्यासाठी गेलेल्या तरुणांचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
अशपाक नगीनेवाले असे मयत तरुणाचे नाव आहे. अशपाक हा बॅनर लावण्यासाठी गेला इमारतीवर गेला होता. पण, बॅनर लावतानाच त्याचा तोल गेला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या तरुणाच्या मृत्यूनंतर हॉस्पिटल परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणाव निवळला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.