नाशिक – सिडकोत कामटवाडे शिवारात घरफोडी; चोरट्यांनी तीन लाखांचा ऐवज केला लंपास
नाशिक – घरफोडी करुन सिडकोत कामटवाडे शिवारात शंभुराजे नगरला चोरट्यांनी तीन लाखांचा ऐवज लंपास केला. शंभुराजेनगरला सिध्दीविनायक अर्पाटमेंटमध्ये रहायला असलेले सुरेश होळकर यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी १५ ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या, ५० ग्रॅमची सोन्याची पोत, १० ग्रॅमचे सोन्याचे नेकलेस, २० ग्रॅमचा सोन्याचा हार, १५ ग्रॅमचे सोन्याचे वेल, ५ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ६ ग्रॅमचे सोन्याची नथीसह इतरही सोन्या चांदीचा सुमारे ३ लाख दोन हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घरफोडी प्रकरणी सुरेश विश्वनाथ होळकर (वय ६१,शंभुराजेनगर कामटवाडे) यांच्या तक्रारीवरुन अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या घरातील लाखोचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास
नाशिक – बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या घरातील लाखोचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सातपूरला गंगापूर शिवारातील शिवाजीनगर भागात घडली. गणेश बाळासाहेब गवळी यांच्या तक्रारीवरुन गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गवळी व त्यांच्या मागील गल्लीत राहणारे अशोक वाघ हे दोन्ही कुटुंब बाहेरगावी गेले असता, चोरट्यांनी दोन्ही घरांचे कुलुप कशाने तरी तोडून घरात प्रवेश करीत, बेडरुममधील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे सोन्याचे ओम पान, नथ, चांदीचे पैजन वाळे, १५ ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या, वेढे,मणी असा सुमारे लाखांहून आधीकचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. सातपूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.