नाशिक – इंदिरानगर पोलिसांनी शहरात दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास वर्षभरासाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार केले आहे. आदित्य राजेंद्र घुमरे (१९, रा. आनंदनगर, पाथर्डी फाटा) असे तडीपार केलेल्याचे नाव आहे. आदित्यविरोधात अंबड, सातपूर, इंदिरानगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी चोरी पाच गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त विजय खरात यांना दिला होता. त्यानंतर आदित्य यास वर्षभरासाठी तडीपार करण्यात आले. तडीपारीनंतर त्याला कोपरगाव येथे सोडण्यात आले. इंदिरानगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बांबळे, उपनिरीक्षक ए. व्ही. उघडे, अंमलदार प्रभाकर पवार, दत्तात्रय गवारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.