नाशिक – पुण्याला कंपनीत पोहोचविण्यासाठी ट्रकमधून पाठविलेला साडे सहा लाखांचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे. २३ फेब्रूवारीला रात्री अंबड येथील फॉर्म्युना इंजिनिअरिंग कंपनीतून माल भरलेला ट्रक म्हाडा कॅालनीत पार्क करण्यात आला होता. त्यात कंपनीचा मोटार जनरल पार्टचा सुमारे ८ लाख ९० हजार ४२२ रुपयांचा माल होता. श्री जी ट्रान्सपोर्ट येथे ट्रक (एमएच १५ इजी ७५२३) खाली करण्यास गेला असता ही घटना उघडकीस आली. त्यातील ६ लाख ६५ हजार ७९१ रुपयांचा माल चोरट्याने रस्त्यातच गायब केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी विठ्ठल सखाराम वाकडे (वय ५४, श्रीजीबंगला वासननगर, पाथर्डी फाटा) यांच्या तक्रारीवरुन अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.