फेसबुक लाईव्ह पडले महागात, पोलीसांनी दाखल केला गुन्हा
नाशिकः फेसबुक या सोशल माध्यमाद्वारे पोलीस दलाविरोधात चिथावणी खोर वक्तव्य, पोलीस आयुक्तांचा अपमान करून जनमानसात पोलीसांबद्दल संतापजनक भावना निर्माण केल्या प्रकरणी एकावर माहिती तंत्रज्ञान तसेच प्रक्षोभक वक्तव्यचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन जयवंत देशपांडे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. त्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक अनिल शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार २६ ते २९ मे दरम्यान फेसबुक या सोशल माध्यमांवर संशयित देशपांडे यांनी पोलीसांविरोधात प्रक्षोबक व्यक्तव्य केल्याचे म्हटले आहे. यामुळे जनसामन्यांत पोलीसांबद्दल संताप निर्माण होण्याच्या हेतुने चिथावणी दिली. पोलीस दल व आयुक्तांचा अपमान यात करण्यात आला आहे. यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. गुन्हेगारांना मदत करण्याच्या हेतुने हे वक्तव्य केले. तसेच ते फेसबुक वरून लाईव्ह प्रसारीत केले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्रीपाद परोपकारी करत आहेत.
…..