महिलेचा विनयभंग
नाशिक : नाशिकरोड परिसरात घरात एकटी महिला असल्याची संधी साधत २५ ते ३० वयोगटातील अनोळखी तरूणाने घरात घुसून मारहाण करीत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. रविवारी ही विविहीत महिला आपल्या घरात एकटी असल्याची संधी साधत या अनोळखी तरूणाने महिलेस काही कळण्याच्या आत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने त्यास प्रतिकार केला असता त्याने दमदाटी व लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर तीचे कपडे फाडून विनयभंग केला. महिलेने आरडाओरड करताच या तरुणांनी धुम ठोकली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
…….
झाडाला वायर बांधून आत्महत्या
नाशिक : सिडकोतील शिवाजीचौकात एकाने झाडाला वायर बांधून आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अशोक सुदाम चव्हाण (५० रा.दत्तचौक,सिडको) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. चव्हाण यांनी सोमवारी (दि.२८) अज्ञात कारणातून नजीकच्या शिवाजी चौक येथील योगेश्वर स्वाध्याय केंद्र भागात रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडास वायर बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. याबाबत भरत देशमुख यांनी खबर दिल्याने मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.